दिनांक: २३ मार्च २०२५
कोलगाव शिवसेना आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त
३० मार्च रोजी दुपारी २ वाजता कोलगाव ग्रामपंचायत जवळ पारंपारिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या दिवशी ढोल पथकासोबत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेशभूषा स्पर्धा लहान गट (१ ते १४ वर्षे वयोगट), मोठा गट महिला व पुरुष तीन गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असून या स्पर्धेतील
सर्व सहभागी स्पर्धकांना मानधन व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी बुधवार २६ मार्च पर्यंत सुशांत ठाकूर ९४२१२०७४८२ आणि मुकेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नितेश पेडणेकर, अभिजीत टिळवे आणि रितेश विद्येश धुरी यानी केले आहे.
