आताच शेअर करा

सिंधुदूर्ग:संपादकीय

दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५


    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात तळवणे या गावात सर्व्हे नंबर ११ या ठीकाणी अवैध खनीज उत्खनन सुरु असल्याचे उपसरपंच रंजन गावडे यांनी आरोप केला आहे.तसेच सदर खनीज उत्खनन करीता काम करीत असलेल्या कंपनीने आपल्या इंडियन ब्युरो आॕफ माइन्स,शाखा कार्यालय,फातोर्डा गोवा कार्यालयाकडून परवाने, मायनींग  प्लॅन,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी  कार्यालयातील ( consent to operate) परवानगी, (environment clearance) पर्यावरण,महासंचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन नागपूर यांचे परवाने आवश्यक असतात. असे असताना मात्र या मायनींग प्रकल्पासाठी कोणतेही परवाने न घेता सध्या स्थितीत तळवणे गावात नव्याने सुरु करण्यात आलेले मायनींग  उत्खनन हे बेकायदेशीर असुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडविला जात आहे अशी माहिती गावडे यांनी दिली आहे.या अवैध  उत्खननापासुन तळवणे गावाला कोणताही फायदा नसून उलट गावात प्रदूषण, शेतीचे नुकसान होत आहे.तसेच या मायनिंग प्रकल्पामुळे कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही.तसेच कोणतीही शालेय अथवा आरोग्य विषयक सुविधा सुद्धा आजपर्यंत उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत.शासनस्तरावर तक्रारी केल्यास ढिम्म प्रशासन फक्त मुग गिळुन गप्प राहतात. मात्र प्रत्यक्ष कारवाई कोणतीही केली जात नाही. यामागे कोणाच्या आशीर्वादाने एवढी अवैध लूट सुरु आहे.याची त्वरीत उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी मांयनिंग कार्यालयं नागपूर, रत्नागिरी व गोवा याठीकाणी निवेदन देवून सर्वसामान्य जनतेसाठी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे असून सदर मायनिंग उत्खनन प्रकल्प तात्काळ बंद करावा अन्यथा राजरोसपणे सुरु असलेल्या बेकायदेशीर प्रकल्प विरोधात संपुर्ण तळवणेतील जनतेसह खनिकर्म विभाग ओरोस येथे आंदोलन छेडण्याचा इशारा तळवणे उपसरपंच रंजन गावडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *