आताच शेअर करा

दिनांक: २ फेब्रुवारी २०२५

सावंतवाडी:आवड आणि छंद जोपासताना व्यावसायिक जोड देत आपले करिअर घडवण्याची संधी  अप्लाइड आर्ट मध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडताना योग्य निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होईल या शिबिराचा फायदा आपल्या भविष्यात नेमके काय करायचे आहे कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. असा विश्वास *डी.जी. बांदेकर ट्रस्ट* चे अध्यक्ष गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व्यक्त केला. 

  यांच्यावतीने सावंतवाडी येथे *बी एफ ए (फाईन आर्ट) पदवी अभ्यासक्रम आणि सीईटी प्रवेश परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. गोविंद बांदेकर बोलत होते.                                                यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन जगताप यांनी केले. विभाग प्रमुख प्रा. तुकाराम मोरजकर यांनी बी. एफ. ए. कोर्स संबंधी माहिती दिली आणि प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी सीईटी प्रवेश प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन केले. प्रा.प्राजक्ता वेंगुर्लेकर यांनी आभार व्यक्त केले.                                                प्राचार्य श्री. उदय वेले सर म्हणाले माझा या क्षेत्रामध्ये तीस वर्षाचा अनुभव आहे. हा तीस वर्षाचा अनुभव या विद्यार्थ्यांना देता यावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आजच्या घडीला अनेक मान्यवर या क्षेत्रात काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात कलात्मक पद्धतीने डिझाईन करण्याची संधी आहे. मनापासून तुम्ही ही संधी साधून काम केले तर अतिशय सुंदर काम करू शकता.  वृत्तपत्र, जाहिरात कंपन्या, फिल्म डिव्हिजन, ग्राफिक डिझाईन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, ॲनिमेशन, व्ही एफ एक्स, गेमिंग इंडस्ट्री, सेट डिझाईन , पब्लिशिंग अशा विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *