
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५
रत्नागिरी: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ आणि आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण, विज्ञान आणि तरुणांकरिता समर्पित केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाच्या प्रगतीसाठी अर्पित केला. त्यांचा जन्म दिनांक १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे झाला. त्यांना ‘भारताचे मिसाईल मॅन’ (भारताचे क्षेपणास्त्र पुरुष) म्हणून सुद्धा ओळखलं जात. त्यांचा वाढदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ तसेच ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि डॉ. कलाम यांचे विकसीत भारताचे स्वप्न साकार करणे. डॉ. कलाम साहेबांचा साधेपणा, वैज्ञानिक विचारसरणी आणि प्रेरणादायी विचार लाखो तरुणांना नेहमी मार्गदर्शक असतो.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करून करण्यात आले. डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य आणि कशाप्रकारे अपयशातून यशाची पायरी गाठली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री हेमंत गौरीकर, अध्यक्ष, करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.) करंजा, रायगड हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी संशोधन केंद्रातील अधिकारी डॉ. ए.यु. पागरकर (प्राध्यापक), डॉ. एच.बी. धमगये (अभिरक्षक), प्रा. एन.डी. चोगले व प्रा. एस.बी. साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही.आर. सदावर्ते व श्रीम. ए.एन. सावंत (जीवशास्त्रज्ञ), श्री. एस. तांबे (कार्यालय अधिक्षक), श्री. आर.एम. सावर्डेकर (व.प्रयोगशाळा सहाय्यक) आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.