आताच शेअर करा

दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त १६ ऑक्टोबर, २०२५ रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावर्षीच्या जागतिक अन्न दिनाची अधिकृत थीम “हॅन्ड इन हॅन्ड फॉर बेटर फूडस अँड बेटर फ्युचर ” अशी असून, शाश्वत कृषी-अन्न प्रणाली निर्माण करण्यासाठी सरकार, संस्था आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे महत्त्व या विषयातून अधोरेखित केले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. बी. साटम सर यांनी केले. सर्वप्रथम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतनककुमार जे. चौधरी सर तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. डॉ. ए. यू. पागारकर यांनी “पोषणात माशांचे महत्त्व” या विषयावर सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर डॉ. के. जे. चौधरी सर यांनी “मत्स्य व्यवसायाची सद्यस्थिती आणि माशांपासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती” यावर व्याख्यान दिले.
कार्यशाळे दरम्यान  सौ. ए. एन. सावंत, सौ. व्ही . आर . सदावर्ते , डॉ. ए. यू. पागारकर व  डॉ. एच. बी. धमगये यांनी “फिश वडा आणि कोळंबी लोणचे” हे पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जलजीविका, रत्नागिरी चे कार्यकर्ते श्री चिन्मय दामले आणि श्रीमती पियुशा देसाई यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमात सहभागी करून घेतले .
शेवटी गटचर्चा व समारोप समारंभ घेण्यात आला. या कार्यशाळेत एकूण ५० हून अधिक महिला, मत्स्यव्यवसायी व मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी सहभागी झाले. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ संजय भावे सर, संशोधन संचालक डॉ . प्रशांत शहारे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्व अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *