बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर

दिनांक: २५ जानेवारी २०२५
खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, वार्षिक परीक्षा, शाळाबाह्य परिक्षा, कला, क्रिडा तसेच विज्ञान क्षेत्रात उत्तम प्रगती दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अन्वर खान यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि वाचन या शिवाय पर्याय नाही असा संदेश दिला तर प्रमूख पाहुणे श्री कैलास जाधव यांनी विद्यार्थ्यांनी गुरुशी प्रामाणिक राहून चतुरस्र व्यक्तिमत्व विकसित करावे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी संस्था कार्यकारिणी सदस्य श्री प्रविण नाईक यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि कन्ये सहित सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. सोबत शालेय समन्वय समिती सहसचिव श्री नंदकुमार नाईक हे होते. सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संस्था, शाळा, शिक्षक आणि समाजातील दात्यानी जाहीर केलेल्या रकमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अन्वर खान, प्रमूख पाहुणे श्री कैलास जाधव यांच्या सहित जेष्ठ निवृत्त शिक्षक गुरुवर्य गर्दे सर, बांदा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. जी नाईक, पर्यवेक्षक पी. एस. सावंत, जेष्ठ शिक्षक पी. यू. देसाई, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष हेमंत दाभोलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिकेत सावंत व रणधीर रणसिंग उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या अहवाल वाचनाचे काम श्री अनिकेत सावंत यांनी केले. सूत्र संचालनाचे काम श्री रणसिंग सर आणि सौ श्यामल सावंत यांनी केले. तर आभार श्री पी. एस. सावंत यानी मानले.