
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर
दिनांक: ७ जानेवारी २०२५
महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताह च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्या बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालय येथे हे शिबीर संपन्न होईल. लाइफ टाइम हॉस्पिटल व एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे कडील तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे शिबीर संपन्न होईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून शिबीर यशस्वी करावे असे आवाहन बांदा पोलिस ठाणे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.

