
न्हावेली प्रतिनिधि
दिनांक:१ जानेवारी २०२५
रंगोत्सव सेलिब्रेशन,मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेने दैदिप्य कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतात शाळेचे नाव उज्वल केले आहे. प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी कु. सई नारायण मांजरेकर हिने राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र रेखाटन स्पर्धेमध्ये (Sketching Competition) संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावत शाळेच्या गौरवशाली इतिहासात एक सोनेरी पान जोडले आहे या तिच्या कामगिरीबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे इयत्ता चौथी मध्ये शिकणारी कु. कलंगुटकर प्रांजल विलास या विद्यार्थिनीने रंगभरण (Colouring Competition)स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतातून चौथा क्रमांक पटकावला त्याबद्दलही तिचे कौतुक होत आहे. तसेच इयत्ता आठवी मधील कु. शौनक दीपचंद्र हरमलकर या विद्यार्थ्याने छायाचित्र रेखाटन (Skeching Competition)या स्पर्धेमध्ये तर इयत्ता सातवी मधील कु. कदम मयुरेश अनिल या विद्यार्थ्याने रंगभरण (Colouring Competition) स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले.
रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. २० विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले. १५ विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले तर ०९ विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संपूर्ण पंचक्रोशीत भरभरून कौतुक होत आहे. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन आदरणीय डॉ. शेखर जैन सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शब्दसमनांनी कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पुढील कामगिरीसाठी लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय हेमंत तानावडे सर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले त्याचप्रमाणे प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातूनही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

