
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर
दिनांक: ३० डिसेंबर २०२४
डेगवे येथे मंगळवार दिनाक ३१ डिसेंबर रोजी खास शेतकरी बांधवांन साठी शेतकरी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सिताराम उर्फ आबा देसाई आणि परिवार यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम डेगवे मोयझरवाडी येथे आयोजीत केला जाणार आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना शेती विषयक आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी थेट आपले प्रश्न कृषी अधिकारी किंवा वन विभाग अधिकारी यांना आपले प्रश्न विचारू शकतो.तसेच पर्यटन क्षेत्रातील अनेक विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम विशेष असून सर्व कृषी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. असे आयोजकांच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले आहे.
हया कार्यक्रमासाठी तालुक्यातील कृषी अधिकारी वनविभाग अधिकारी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे सर्वांनी उपस्थीत राहुन कार्यक्रमाचा व स्नेहभोजनचा लाभ घ्यावा.

