आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक: १७ मे २०२४

सावंतवाडी तालुक्यातील
भालावल येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला.परदेशीया जितू उराव (वय २०, मूळ राहणार सुपा – झारखंड, सध्या रा. भालावल) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
   याबाबत भालावलं येथील उदय परब यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परदेशीया हा उदय परब यांच्या बागेत गेली ४ वर्षे काम करत आहे. आपल्या सहकारी कामगारासोबत तो बागेच्या लगत असलेल्या नदीत पाण्याचा पंप जोडत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला.तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. लगतच्या कामगाराने याची कल्पना मालक परब यांच्यासह स्थानिकांना दिली.सायंकाळी उशीरा स्थानिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी बी पालकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. बांदा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *