गोवा पेडणे /प्रतिनिधि
दिनांक: १२ डिसेंबर २०२४
धारगळ देऊळवाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा टेम्पो आणि कार मध्ये धडक झाली या धडकेमध्ये एम एच ०२ बीटी ८३६४ वोल्क्सवॅगन वेंटो (Volkswagen Vento) ही गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना अति वेगाने धावत होती.
गाडी क्रमांक (GA11T6445) टेम्पो रिक्षा वळण मारत असताना समोरील वाहक चालकाचा गाडीवरील ताबा सुटून भरधाव वेगाने या गाडीने धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की टेम्पो रिक्षा डिव्हायडर वर जाऊन पाठची दोन्ही चाके त्या डिव्हायडर वर चढली व धडक देणाऱ्या गाडीचा दर्शनी भागाचे नुकसान झाले.सुदैवाने दोन्ही गाडीमध्ये कुठच्याही व्यक्तीला जबर मार किंवा जीवितहानी झाली नाही. स्थानिक रहिवाशांनी आणि तेथील जमावाने. दोन्ही गाडीतील व्यक्तींना बाहेर काढून तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.