आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर

दिनांक:१ डिसेंबर २०२४सालाबादप्रमाणे श्री देवी माऊली मंदिर, डोंगरपाल  वार्षिक जत्रौत्सव २०२४  सोमवार दिनांक – २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे.नंतर ओटी भरणे,नवस बोलणे आणि नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत.रात्रौ १२.०० वाजता पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम आणि त्यानंतर लोकराजा  कै.सुधीरजी कलींगण यांचा सुपुत्र आणि विद्यमान मालक युवा राजकर्ता  श्रीमान श्री.सिद्धेश कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य कंपनी, नेरूर – कुडाळ ,या सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध कंपनीचा दणदणीत असा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. लोकराजा सुधीर कलिंगण यांनी चालवलेला वारसा त्यांचे पुत्र श्री. सुधीर कलिंगण हे चालवत आहेत.
तरीही सर्व भाविकांनी नाट्यरसिकांनी या सुसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे डोंगरपाल ग्रामस्थांच्या वतीने आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *