आताच शेअर करा

वैभववाडी प्रतिनिधी

दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४

मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे असे नाव असून वय वर्ष ३० राहणार शेर्पे भटवाडी. ही घटना शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत विक्रम नमसे हा आपल्या दोन मित्रासह गोठणे नदीवरील नापणे येथील धबधब्यावर फिरायला गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला. मित्रा समवेत तो धबधब्याच्या वरच्या बाजूला आंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो मयत झाला होता. विक्रम आपल्या  आई-वडिलांसमवेत शेर्पे येथे राहत होता. आई-वडील आजारी असल्या कारणामुळे तो तिथेच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचा एक भाऊ मुंबई येथे राहतो.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचारी बिलपे, उद्धव साबळे, महिला पोलीस श्रीमती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

नापणे धबधबा हा बारा माई वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध असून या धबधब्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू असते. या धबधब्यावर यापूर्वी अशा प्रकारे पोहण्यासाठी उतरलेल्या पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. धबधब्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच धबधब्यावर येऊन मनमोहक आनंद लुटताना पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी  अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *