मुंबई:प्रतिनिधि
दिनांक:२६/१०/२०२४
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र ‘ द फॉक्स फेम ‘ अनिल कांबळे- सरमळकर यांचे Enemy Of America हे पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने अमेरिकेतील ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच प्रकाशित होत आहे.
अनिल कांबळे सरमळकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेतुन कविता, नाटक, कादंबरी, चित्रपट पटकथा लेखनाबरोबरच दर्जेदार वैचारीक व समीक्षा लेखनही केले आहे.
The fox या नाटकाने अनिल कांबळे सरमळकर यांना जागतिक कीर्ति व यश मिळवुन दिले. The fox हे नाटक जागतिक रंगभूमी व साहित्यात अत्यंत महत्वाचे म्हणुन त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. तसेच त्यांच्या त्यानंतर प्रकाशीत झालेल्या
Its Already Tomortow या ॲब्सर्ड शैलीतील इंग्रजी नाटकाने जागतिक रंगभूमी व साहित्य वर्तुळातील विद्वान विचारवंत व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच अनिल यांच्या या लेखनामुळेच त्यांचे नाव जागतिक किर्तीच्या अमेरिकन व युरोपीय विद्यापीठांत सर्वदूर पसरले आहे.
अलीकडेच त्यांचे Death of Arts हे एकूणच वैश्विक कला आणि त्याचा होणारा संभाव्य अंत याबद्दलचे खळबळजनक भाष्य करणारे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असुन त्याची अनेक मोठ्या युरोपीय विद्यापीठांतुन व नामवंत समीक्षक विचारवंत इत्यादींकडुन दखल घेतली जात आहे.
दरम्यान Enemy Of America हे लेखन स्फोटक विचारांनी आणि लेखनातील प्रयोगशीलतेने भरलेले असुन लेखक अनिल कांबळे सरमळकर यांनी गेल्या दोन दशकात अमेरिकन बकासुरी भांडवलशाहीची, अमेरिकन रणनीतीची जी समीक्षा केली आहे ते संपूर्ण लेखन एका नावीन्यपूर्ण फॉर्म मधून या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले आहे.
अमेरिकन निरंकुश भांडवलशाही साम्राज्यवाद,युध्दपिपासु रणनीती इत्यादीचे परखड टिकात्मक विवेचन अनिल सरमळकर यांनी या पुस्तकात करतांना अमेरिकेतील सकारात्मक बाजूंच्या सामर्थ्याचे कौतुकही केले आहे. मात्र हे लेखन केवळ वैचारीक नसुन या लेखनात वेगवेगळ्या फॉर्म्सचा प्रयोग करण्यात आला आहे तोच वाचकांसाठी उत्सुकतेचा भाग असेल असे अनिल यांनी कोकण व्हिजन न्युज शी संवाद साधताना सांगितले.
तथापि ऐन अमेरिकेतील निवडणूकांच्या काळात हे पुस्तक खुद्द अमेरिकेतच प्रकाशीत होत आहे या धाडसाबद्द्ल लेखक अनिल कांबळे सरमळकर व प्रकाशक यांचे कौतुक होत
असुन या पुस्तकाबद्दल कोणत्या प्रतिक्रिया अमेरिकेत उमटतील हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.




