
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक:२० ऑक्टोंबर २०२४
दारू वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या अंगावर गाडी घातली. ही घटना आज सायंकाळी बांदा बांदेश्वर नजिक घडली. गाडी वेगाने चालवत असताना त्याने बाजारपेठेतील एका स्टॉल व दुचाकीला धडक देत पलायन केले.
दरम्यान या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले. संबंधित प्रकार करणाऱ्या दारू व्यावसायिकाला तात्काळ अटक करा, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र या घटने दरम्यान शहरात असलेले सीसीटीव्ही फुटेज बंद असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.


संपर्क 8369539769/9819957223