
बांदा प्रतिनिधि
दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४
काल संध्याकाळी झालेल्या विजेच्या गडगडाटा सह मडूरा रेडकर वाडीतील श्री. रूपेश सूर्यकांत मडूरकर यांच्या घरा शेजारी आसलेल्या बागेतील माडावर विज पडून माड पुर्ण चिरला गेला. तेथील आसलेल्या मोटर पंपाच्या लाइन मधून घरात विज गेली. सर्व वायरिंग जळून गेली मीटरची फ्यूज दहा फुटावर तुटून जाऊन पडली. हा प्रकार संध्याकाळी ४:३० च्या दरम्यान घडला. दैव सुयोगाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण मडूरकर यांच्या घरातील फिटिंग खराब झाल्याने पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे.परंतू तेथून रोज प्रवास करणारे ग्रामपंचायतीचे क्लार्क श्री. शंकर माधव हे काही काहिषणासाठी वाचले नाहीतर अनर्थ घडला असता.



8369539769/9819957223