
सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४
आज पासून मडूरा येथे श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवात ३ ते ११ ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दररोज सकाळी श्रींची विधिवत पूजा दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद महाप्रसाद व सायंकाळी स्थानिकांची भजने व आरतीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीची पूजाअर्चा घटस्थापना होईल. शुक्रवारी ४ रोजी चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होईल. शनिवारी ५ रोजी ९:०० वाजता वालावलकर दशावतार मंडळाच्या नाट्य प्रयोग होईल. रविवारी ६ रोजी रात्री ८ वाजता दांडिया नृत्य ९ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाच्या नाट्य प्रयोग होणार आहे. सोमवार ७ रोजी रात्री ९ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. मंगळवार ८ रोजी रात्री ८ वाजता दांडिया नृत्य ८:३० वाजता सौ.संजना परब पुरस्कृत महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होईल. विजेतीस १० हजार रुपये किमतीची पैठणी तर उप विजेतिस ५ हजार रुपये किमतीची पैठणी दिली जाणार आहे. बुधवारी ९ रोजी रात्र नऊ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. गुरुवारी ७ वाजता दांडिया नृत्य ९ वाजता श्रीमान श्रीमती हा कार्यक्रम होईल. गुरुवारी ११ रोजी ७:३० वाजता सावली महिला समूह गटातर्फे हळदीकुंकू समारंभ ८:३० वाजता दांडिया नृत्य ९ वाजता महिलांसोबत भव्य दीपोत्सव व महाआरती होईल. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या महिलास आकर्षक पैठणी देण्यात येईल. शनिवारी १२ रोजी दसरा उत्सव होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.