सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर
दिनांक: २० सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रच्या सिंधुदूर्ग-गोवा सीमेवर तेरेखोल नदीपात्रात सातार्डे फुलावर आज सायंकाळी पावणे पाच च्या दरम्यान एका युवकाने नदीपात्रात उडी मारली. स्थानिकांनी उडी मारताना सदर युवकास पाहिले. स्थानिक रहिवाशी आणि वाळू व्यवसायिकांनी नदीपात्रात युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत युवकाचा शोध लागला नाही. सदर युवक आरोस – कोंडुरा येथील असल्याचा अंदाज आहे घटनास्थळी त्याचे आधार कार्ड आढळून आलेले आहे. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
