
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:५ सप्टेंबर २०२४
बांदा येथे बाजारपेठेत गणपती उत्सवा निमित्त गावी आलेल्या चाकरमान्यांची अलोट गर्दी झाली होती. तसेच चार चाकी वाहनांनी बाजारपेठेत गाड्या घातल्याने ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली दुपारच्या वेळेत पोलीस पहारा कमी झाल्याने या गर्दीत चार चाकी वाहन धारकांनी भर बाजारपेठेत गाड्या घातल्या त्यानंतर बराच उशिरापर्यंत रहदारीचे मार्ग बंद झाले होते. पोलिसांनी पार्किंगची सुविधा, व्यवस्थित गाडी लावण्यासाठी मार्ग दाखवण्यास पोलीस कर्मचारी नसल्याने हा गोंधळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तरी या दोन दिवसात व्यवस्थितरित्या वाहनतळापर्यंत जाण्यास पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे बांदा बाजारपेठेत खिसे कापू आणि चोरीच्या उद्देशाने गर्दीचा फायदा उचलून या गर्दीत फिरणारे इसम संधी साधून आपले काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने फिरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून चार चाकी आणि दोन चाकी वाहनांना योग्य त्या वाहन तळाची व्यवस्था करावी.
