
न्हावेली : प्रतिनिधि
दिनांक: २१ ऑगस्ट २०२४
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपास लगत असलेल्या मळगाव कुंभारवाडी शाळेलगत सर्विस रोडवर भले मोठे भगदाड पडले आहे. याठिकाणी ये-जा करणारी शाळेची मुले तसेच अन्य वाहनधारकांसाठी त्यामुळे धोका निर्माण झाला असून त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
या महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडची अक्षरश चाळण झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना गाड्या चालवाव्या लागतात.अनेक गाड्या येथे अपघातग्रस्त होत असतात मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरणचे वेळोवेळी लक्ष वेधूनदेखील हे खड्डे बुजविण्याचे काम केले जात नसल्याने स्थानिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
