आताच शेअर करा

कोकण व्हिजन न्यूज
       (शोध सत्याचा)
संपादक: यश माधव

सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर

ता: १४ एप्रिल २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांची पदोन्नतीने नाशिक विभागाचे जॉइंट कमिशनर म्हणून बदली झालेली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. यानिमित्त सोमवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता केमिस्ट असोसिएशनच्या कुडाळ येथील जिल्हा कार्यालयात  त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
          अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिलिंद पाटील यांचा त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच केमिस्ट बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *