सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर
ता:१५ एप्रिल २०२४
आंतरराष्ट्रीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शिवशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते विनायक गुरव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, सामाजिक कार्यकर्ते विनायक गुरव, परशुराम चालवादी, चराठ्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्राम कांबळे आदीसह भीमशक्ती संघटनेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष, धर्म, जातीसाठी महान कार्य केल्याचे सांगून याचे भान सर्वांनी ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी विश्राम कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नसून ज्ञानाची संपत्ती असलेले विचार असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या सर्व समावेशक विचारांची गरज आज देशाला असल्याचे सांगितले.
यावेळी अंकुश परब, वैभव राणे, भगवान तारी, दीपक जाधव, राजन कासले, मोरेश्वर जाधव, संतोष जाधव, निलेश असनियेकर, स्वप्नील जाधव, गणेश जाधव, कांचन जाधव, संगीता जाधव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, शंकर कांबळे, अजित न्हावेलकर, किरण कांबळे आदी उपस्थित होते.