
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक :१६ ऑगस्ट २०२४
(कै.) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे. समाजाला अशा रुग्णसेवेची गरज आहे. फौंडेशनच्या या समाजपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू असे आश्वासन मुंबई येथील भूल तज्ञ डॉ. मृणाल तोरसेकर यांनी येथे दिले.
डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशन संचलित (कै.) डॉ. नंदू तोरसेकर रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. तोरसेकर बोलत होत्या. बांदा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाडकर्णी कुटुंबियांनी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली. या जागेत फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना लागणारे वैद्यकीय साहित्य, व्हील चेअर, रुग्णांसाठी खाटा, वॉकर, यासंह अनेक वस्तू असून या रुग्णांना त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात येतात.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची तर फीत कापून रुग्णसेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, वरूण तोरसेकर, मिलिंद कुलकर्णी, भाजपा सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, डॉ. कल्याणकर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत डॉ. मिलिंद खानोलकर यांनी केले. यावेळी फौंडेशनच्या कार्यासाठी मृणाल तोरसेकर व रघुनंदन तोरसेकर कुटुंबीय यांच्याकडून ५० हजार रुपये, प्रमोद कामत, प्रसाद पावसकर व नंदू कल्याणकर यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक देणगी देण्यात आली.
प्रस्ताविकात खजिनदार मंगलदास साळगावकर यांनी फौंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंत रुग्णांना दिलेले साहित्य, रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया तसेच फौंडेशनकडे उपलब्ध असलेले साहित्य याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रियांका नाईक, श्वेता कोरगावकर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार कल्याणकर यांनी केले.
यावेळी फौंडेशनचे सचिव मनोज कल्याणकर, डॉ. भालचंद्र कोकाटे, डॉ. संजय सावळ, डॉ. अनिश स्वार, दिवाकर नाटेकर, जगन्नाथ सातोसकर, सिद्धेश पावसकर, संजय शिरोडकर, निलेश मोरजकर, गुरु कल्याणकर, सुरेश गोवेकर, आशिष कल्याणकर, बाबी वसकर, नंदू कल्याणकर, अक्षय मयेकर, मंगल कामत आदी उपस्थित होते. यावेळी साहित्य मिळण्यासाठी मंगलदास साळगावकर किंवा मनोज कल्याणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आभार डॉ. मिलिंद खानोलकर यांनी मानले.
