
बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:१४ ऑगस्ट २०२४
माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन दिनाक: १३ ऑगस्ट रोजी मोठया थाटामाटात पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा. प्रमोदभाई कामत यांच्या हस्ते फीत कापून कक्षाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी डेगवे गावचे सरपंच मा. राजन देसाई, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, डेगवे सोसायटीचे चेअरमन व शालेय समिती सदस्य मा. प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, शालेय समिती सदस्य मा. अभय देसाई, भरत देसाई, प्रदीप देसाई, श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रेमानंदजी देसाई तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी मा. प्रमोदभाई कामत यांचा मुख्याध्यापक श्री एस के सावंत सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री स्थापेश्वर देवस्थान कमिटी तसेच सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्यामार्फत १०वी व १२ वी तील गुणवान विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील व होतकरू विद्यार्थ्यांना देवस्थान कमिटी मार्फत गणवेश वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सरस्वती चुडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. प्रेमानंदजी देसाई यांनी प्रशालेला रु. ५०००किमतीच्या प्रयोगशाळेतील मायक्रोस्कोप तसेच इतर साहित्य भेट स्वरूपात दिले. मा. प्रमोद कामत यांनी संगणक कक्षाला आर्थिक स्वरूपात मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस के सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल मगदूम व यशदा देसाई यांनी केले.
