कोकण व्हिजन न्यूज
( शोध सत्याचा )
संपादक: यश माधव
बांदा प्रतिनीधी:संकेत वेंगुर्लेकर
ता: १२ एप्रिल २०२४
भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा मंडल महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी सौ. रूपाली सुधीर शिरसाट यांची वर्णी लागली असून ही नियुक्ती भाजपा कार्यालय सावंतवाडी येथे नियुक्तीचे पत्रक सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
सौ. रूपाली सुधीर शिरसाठ यांनी बांदा मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार मानले. आपण दिलेली जिम्मेदारी पक्षाच्या दिलेल्या नियमानुसार आणि कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता दिलेली जबाबदारी पूर्ण करेन. महिला मोर्चा कार्यकारणीला सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहीन तळागाळातील गोरगरीब महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना पक्षाची धोरण समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन व पक्षात सामील करून घेईन. वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीच्या मान सन्मान ठेवून पक्षाची ध्येय धोरण आचरणात आणून भविष्यात पक्ष वाढीसाठी काम करत राहीन.