संपादकीय : सिंधुदुर्ग
दिनांक:२९ जुलै २०२४
सोनुर्ली सीमेलगत रोणापाल येथील जंगलात आज एक मूळ अमेरिकन असलेली महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली आहे.गुराख्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. मुसळधार पावसात गेले काही दिवस ती या स्थितीत असल्याचा संशय आहे. तिला नीट बोलता येत नाही तरी आपल्या पतीने छळ करत येथे आणून बांधण्याचा तिने चिठ्ठीद्वारे लिहून उल्लेख केला आहे. गेले ४० दिवस आपला पती आपला छळ करत आहे. आपल्या या अवस्थेत इथे टाकून पळून गेल्याचे तिचे म्हणणे आहे. ललिता कुमार एस (वय वर्ष ६० राहणार चिंगम रोड तिरुवन्नामलाई तामिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. उशिरापर्यंत याबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट झाली नव्हती संबंधित महिला सकाळी साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडली. मला माझ्या पतीने गेले ४०दिवस उपाशी ठेवले.
प्रकृतीला प्राण घातक अशी औषधे मला जबरदस्तीने पाजली.त्यानंतर त्याने माझा छळ सुरुवात केला आणि ह्या ठिकाणी आणून जंगलात बांधून तो पळून गेला. अशा आशयाची चिठ्ठी महिलेने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पोलिसांना दिली.
त्या अजून बोलण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे या प्रकरणाचे गुड पूर्णतः उघडलेले नाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी ओरस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचा सूत्रधार संबंधित महिलेचा पती असल्याचा उलगडा तिने लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये प्रथमदर्शनी दिसून येत आहे. माझ्या पतीने चुकीची औषधे पाजून उपाशी ठेवून आपला छळ करत आपल्याला या जंगलात आणून बांधले व तु याच जंगलात मरून जाशील आणि मी या गुन्हाचा साक्षीदार बनून पळून जाईन असे म्हटल्याचे नमुद केले आहे. महीला मूळची अमेरिकेची आहे.