आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि

दिनांक: २८ जुलै २०२४


आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पडझडीचे सत्र सुरू आहे. शनिवारी सकाळी शेर्ले येथे झाड कोसळून विद्युत वाहिनीवर पडले. तत्काळ याची खबर वीज वितरणला देण्यात आली व वीजपुरवठा खंडित करण्यात आला.  दरम्यान रस्त्यावरून वाहतूक नसल्याने अनर्थ टळला.
बांदा शिरोडा मार्गावरील शेर्ले येथे शनिवारी सकाळी वादळी वारापाऊस झाला. यावेळी अनेक ठिकाणी पडझड झाली. धोकादायक झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष एक दिवस प्रवासी किंवा वाहनचालकाच्या अपघातास कारणीभूत ठरेल अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिल्या. दुपारपर्यंत ग्रामस्थांनी वाहिन्यांवर व रस्त्यावर पडलेले झाड हटवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *