महावितरणचा विद्युत खांब उपटून पाडला गेले आठ दिवस विज खंडीत
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक : १८ जुलै २०२४
सातार्डा येथील रायचे पेड ते केरकर वाडी येथे जाणारा रस्ता पुलाच्या बाजूला खचला असून तो रस्ता धोकादायक निर्माण झाला आहे. सविस्तर माहिती अशी की सध्या चालू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे रायचे पेड ते केरकरवाडी ह्या रस्त्यावर गोव्याच्या दिशेने मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता हा फुलाजवळ खचला असून त्या रस्त्याची अतिशय दहनिय परिस्थिती झालेली आहे. अतिवृष्टी झाल्या कारणामुळे बाजूला असणारा महावितरणाचा खांब उखडून पडला असून तेथील दोन्ही साईटच्या वीज वाहक तारा हे खाली आले आहेत. तेथील वीज सद्या स्थितीमध्ये खंडित करण्यात आली आहे. परंतु जर समजा ही अतिवृष्टी चालू राहिल्यास भविष्यात या रस्त्यावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. रात्री अपरात्री ह्या रस्त्याने गोव्याकडे जाणारे कामगार वर्ग रहदारीचा रस्ता म्हणून जवळचा असल्या कारणामुळे या रस्त्याचा वापर करत असतात. मुंबरडे, काराखंडी सातोसे, मडुरा, रेखवाडी, पाडलोस, रोणापाल, असे बऱ्याचश्या गावातील कामगार वर्ग गोव्याच्या दिशेने जात असताना ह्याच रस्त्याचा वापर करतअसतात. गेले आठ दिवसपूर्वी हा प्रकार घडला असून संबंधित महावितरण आणि बांधकाम विभाग यांनी कोणतीच दखल घेतली नाही. पाऊस पुढील काही दिवसात वाढल्यास हा रस्ता पूर्ण उखडून वाहून जाऊ शकतो. रात्री अपरात्री अचानक प्रवास करणाऱ्या कामगारांच्या आणि स्थानिक गावातील नागरिकांना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी लवकरात लवकर संबंधित विभागाने यावर तोडगा काढून कारवाई करावी असे उपस्थित स्थानिक नागरिक सखाराम धारगळकर, आत्माराम आरोंदेकर, ज्ञानेश्वर धारगळकर, प्रवीण राऊळ यांनी म्हटले आहे.