आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर

दिनांक: १८ जुलै २०२४

माझगाव येथील एन आर सावंत यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धपकाळाने निधन झाले ते माजगाव सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य असताना त्यांनी शेकडो निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला होता.
काँग्रेसचे निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ते होते. सामाजिक कार्य हे त्यांनी निस्वार्थी भावनेने केले मात्र आताच्या राजकारणापासून ते अलिप्त होते. त्यांनीं इंदिरा काँग्रेसचे ते तत्कालीन सावंतवाडीतालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. सावंतवाडी संस्था मराठा समाजाच्या वसतिगृहस्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती श्रीमंत श्रीराम राजे भोसले यांचे सुरुवाती पासून चे ते विश्वासू एकनिष्ठ सहकारी होते. सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे येथील सलग दहा वर्षे सदस्य पंधरा वर्षे विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांनी समाजाची सेवा केली. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीमध्ये ते बारा वर्षे संचालक होते.
१९७० मध्ये आरपीडी हायस्कूलच्या संस्थेवर त्यांनी संचालक म्हणून दहा वर्ष काम केले. तसेच ते स्कूल कमिटी सदस्य ही होते.
१९७० मध्ये माजगाव इंग्लिश स्कूल सोबत आणि चार सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापना केली
स्थापनेपासून सलग वीस वर्षे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले सावंतवाडी सहकारी सोसायटीचे ते १९६९-६२ या दरम्यान चेअरमन होते. १९६०-६१ दरम्यान ते माजगाव सोसायटीचे चेअरमन होते. १९५९ त्याने सावंतवाडीत घड्याळ विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. १९५२-५९ मुंबई येथे त्यानी व्यवसाय शिक्षण घेतले.
घड्याळ विक्री व दुरुस्ती व्यवसाय राईस अँड फ्लोअर मिल व शेती पारंपरिक शेती देखील केली.युनियन इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे त्यांनी दहावीचे शिक्षण घेतले माजगावचे माजी उपसरपंच  होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंब यांचे सांत्वन केले दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. 
स्टेट बँकेचे निवृत्त  व्यवस्थापक गोपाळ सावंत, अँड. शामराव सावंत, पुणे येथील कामगार न्यायालयाचे अँड प्रताप सावंत, सावंतवाडी  येथील आर पी डी  कॉलेजच्या प्रा सौ रमा सावंत – घोरपडे यांचे ते सासरे, तर लांजा कॉलेजचे ग्रंथपाल कमलाकर सावंत यांचे ते काका होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *