
कोकण रेल्वेची यातायात ठप्प पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत रेल्वे गाड्या
दरड काढण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक: १४ जुलै २०२४
सद्या मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत असून खेड आणि चिपळूण या दरम्यान पाऊसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोकण रेल्वेच्या खेड व चिपळूणच्या मध्ये रेल्वे रुळावर भोगदया जवळ संध्याकाळी सुमारे साडे पाच वाजताच्या दरम्याने दरड कोसळली आहे कोकण रेल्वेची यातायात ठप्प झाल्या कारणामुळे सुमारे पाच ते सहा तास रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. काही कालावधी साठी रेल्वे रुळावर धावणाऱ्या गाड्या बंद होत्या. ही दरड बाहेर काढण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम चालु आहे.



