दिनांक: १८/०९/२०२६

शिरोडा: गणपती सणाचा उत्साह तना मानात भरला असताना देखील सामाजिक बांधिलकी दाखवत आपल्या रक्ताची रुग्णांना किती गरज आहे याची जाणीव ठेवत आपल्या रक्तातून समाजातील किती जणांचे जीव वाचू शकतो याची जाणीव राखत गरज पडलेल्या रुग्णांना मदत करावी हे ब्रीद राखून शिरोडा येथील रामपुरूष युवा मित्र मंडळाच्या शिरोडा येथील दोन सदस्यांनी रक्तदान करत रुग्णाची गरज भागवली.
गणपती घरात असताना देखील रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांची दमदार कामगिरी. लोकांकडून कौतुक. देऊ उर्फ अण्णा परब. व राजन धानजी यांनी गोवा बांबोळी ला जाऊन रक्ताची तात्काळ गरज असताना रक्तदान केले. सर्वांकडून मंडळाचे कौतुक करत आहेत.
