
दिनांक:०२/११/२०२६
सावंतवाडी:व्हॉइस ऑफ मीडियाच्या सुप्रीमो शैलेश मयेकर व जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर सावंतवाडी तालुका अध्यक्ष यश माधव व कार्यकारणी यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच समाजातील सामाजिक गोष्टीवर चर्चा करण्यात आली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पुष्पगुच्छ स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत नयनेश गावडे, शैलेश गवस, रणजीत जाधव उपस्थित होते.
