आताच शेअर करा

दिनांक: २८/०८/२०२६

सावंतवाडी:नगरपरिषद सावंतवाडी आणि फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडी शहरात शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे नियमित आणि निःशुल्क चालवल्या जाणाऱ्या योग वर्गामध्ये *रक्षाबंधन महोत्सव* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी योग वर्गाला नियमित येत असणाऱ्या सर्व माता-भगिनींनी पुरुष योग साधक बंधूंना राख्या बांधून बंधू-भगिनीच्या पवित्र नात्याचा सन्मान केला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर मिठाई आणि खाऊचे वाटप देखील करण्यात आले.

फिटनेस योग फाउंडेशनच्या योग वर्गामध्ये केवळ योगाभ्यासच नाही, तर भारतीय सण आणि संस्कृतीची जोपासना देखील केली जाते. या स्तुत्य उपक्रमाबाबत सावंतवाडी शहरामध्ये सर्व स्तरांमधून कौतुक व वाहवा होत आहे.

या नियमित आणि निःशुल्क योग वर्गाचा लाभ सावंतवाडीतील जास्तीत जास्त योगप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

आजचा रक्षाबंधन महोत्सव योग शिक्षक श्री. शेखर बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिटनेस योग परिवाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

*”योगासोबतच संस्काराची शिकवण देणारे फिटनेस योग फाउंडेशनचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे“* अशी प्रतिक्रिया उपस्थित योग साधकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *