आताच शेअर करा

दिनांक:२८/११/२०२६

विलवडे (वार्ताहर):
विलवडे गावच्या ग्रामदैवताचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी देवीच्या विधिवत पूजाअर्चेने होणार असून, दिवसभरात भाविकांकडून देवीची मानाची ओटी भरण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडेल. यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

रात्री ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. पालखी मिरवणुकीनंतर, कोकणच्या लोककलेचा मानबिंदू असलेल्या सुप्रसिद्ध मामा मोचेमाडकर यांच्या दशावतारी नाट्यमंडळाचे शानदार नाटक सादर होणार आहे.

या जत्रोत्सवाचा आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविक व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विलवडे ग्रामस्थ व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed