आताच शेअर करा

दिनांक: २७/०७/२०२६

शिरोडा: गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगाव जवळ दुचाकी वाहन चालकाला  वाचवताना कलंडली असताना ४५ प्रवासी बाल बाल बचावले आहेत.
गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडा च्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली असता घातक वळणावर समोरून म्हणजे मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने वर टॅग करत असताना त्या दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात सदर बस खोलदरीच्या काही फूट अंतरावर कलंडली सदर बस मध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते सदर प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बस व बिळाजवळ घातक वळणावर कलंडली असताना वृत्त समजतात परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली मदतीसाठी धाव घेऊन प्रवाशांना वाचविण्यात आले या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही परंतु आणि काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत गोलदरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता परंतु सदर बच्चा चालकाच्या प्रसंग वादाने बस अलीकडेच कलंडली. दुचाकी वाहन चालकाला सदर बसच्या चालकाने वाचविले तो गाडी टाकून पसार झाला आहे दुचाकीस्वाराच्या वाचवण्याच्या नादात ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते परंतु ड्रायव्हरच्या ड्रायव्हरच्या प्रसंगवधाने सदर घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed