आताच शेअर करा

दिनांक: २७/०७/२०२६

शिरोडा: शिरोडा बाजारपेठेत डास आणि डासांमुळे होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि डेंग्यू,मलेरिया यासारख्या घातक आजारांना वेळीच आळा बसावा यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी शिरोडा बाजारपेठेतील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
     गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व बदलत्या हवामानामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डेंग्यू. मलेरिया हे ताप गंभीर स्वरूपाचे असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.शिरोडा बाजारपेठेतील गटारात घाण पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन शिरोडा ग्रामपंचायत व सार्वजनिक आरोग्य विभागाने शिरोडा बाजारपेठ, भाजी मार्केट मधील गटारे यामध्ये तातडीने जंतुनाशक डास प्रतिबंधात्मक फॉगिंग मशीन द्वारे( धूर फवारणी )करून डासांपासून होणाऱ्या घातक आजार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.अशी मागणी शिरोडा बाजारपेठेतील नागरिकाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed