आताच शेअर करा

दिनांक: १४/०६/२०२६

संपादकीय: आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक धक्कादायक घटना पाहिल्या की एक प्रश्न प्रकर्षाने डोके वर काढतो—आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि पूर्वनियोजित प्रकरणे पाहिली की, हा केवळ एक सामाजिक प्रश्न उरलेला नसून एका मोठ्या छुप्या संकटाचे रूप धारण करत असल्याचे स्पष्ट होते. या वाढत्या चिंतेने प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या मनात आणि समाजात एक अस्वस्थता निर्माण केली आहे.
या धोक्याचे गांभीर्य ओळखणे आणि त्या विरोधात वेळीच सतर्क होणे, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.
संकटाचे स्वरूप आणि गांभीर्य
‘लव्ह जिहाद’ हे केवळ नावापुरते मर्यादित नसून, त्यामागे एक पद्धतशीर वैचारिक आणि मानसिक जाळे विणले जात आहे. निष्पाप हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढणे, त्यांचे भावनिक शोषण करणे आणि अंतिमतः त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणे, असे भयानक वास्तव अनेक प्रकरणांतून समोर आले आहे.
अशा संकटाच्या वेळी केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही. या संकटाचा सामना कसा करावा, कायदेशीर संरक्षण कसे मिळवावे आणि वैचारिक दृष्ट्या मुलींना सक्षम कसे करावे, याचे ठोस उपाय शोधणे आता अनिवार्य झाले आहे.
वैचारिक आणि कायदेशीर सक्षमतेची गरज
या छुप्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर काम करणे गरजेचे आहे:
आपल्या संस्कृतीचे आणि मूल्योंचे भान तरुण पिढीला असणे आवश्यक आहे.
संकटसमयी कायद्याची मदत कशी घ्यावी, याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि या विषयावरील ग्रंथाचे लेखक श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेच्या सद्‌गुरू स्वाती खाडये आणि मुंबईतील विधीतज्ञ अधिवक्ता प्रीती राऊत यांच्यासारखे तज्ञ जेव्हा या विषयावर उघडपणे मार्गदर्शन करतात, तेव्हा त्यामागे समाजाला कायदेशीर आणि वैचारिक दृष्ट्या जागृत करण्याचाच मुख्य उद्देश असतो.
हिंदू जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे, “हे केवळ एखादे व्याख्यान किंवा कार्यक्रम नसून, ही आपल्या अस्मितेची आणि हिंदू कुटुंबांच्या सुरक्षेची लढाई आहे.” जर आपण आज एकत्र आलो नाही आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर उद्या खूप उशीर झालेला असेल.
“आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर घरात शांत बसून चालणार नाही.”
पालक म्हणून आपली जबाबदारी फक्त मुलांचे संगोपन करण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांना अशा अदृश्य संकटांची जाणीव करून देणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे.
चला, जागरूकतेच्या दिशेने पाऊल टाकूया!
या ज्वलंत विषयाचे गांभीर्य समजून घेण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना जाणून घेण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येण्याची वेळ आज आली आहे.
लक्षात ठेवा, आजची सतर्कताच आपल्या उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करू शकते!
लव्ह जिहाद हे एक धर्मसंकट आहे. जागे व्हा बांधवांनो, जागे व्हा आणि उद्याच्या भयानक परिस्थितीचे भान घ्या!
‘अभी नहीं तो कभी नहीं!’

जागे व्हा बांधवांनो!

अंधार दाटतो आहे, आपल्याच उजेडात,
संकट उभे ठाकले, घराच्या उंबरठ्यात.
का अजून आपण सारे, गाफील असे बसलो?
इतिहासाच्या पानातून, काहीच नाही शिकलो?

प्रेमाच्या बुरख्याआडून, खेळ हा छुपा  चालतो,
भोळ्या भाबड्या मनांला , खोटा  फास लागतो .
अस्मितेची ही लढाई, आता तरी ओळखू या,
आपल्याच माणसांना, वैचारिक बळ देऊ या.

कायद्याचे कवच घ्यावे, संस्कृतीचे भान ठेवा,
रक्षण आपल्या लेकींचे, हाच एक धर्म सेवा.
शांत बसून घरात आता, चालणार मुळीच नाही,
आज नाही उठलो तर, उद्या वेळ उरणार नाही.

नव्या तरुण पिढीला, जागृत आपण करू या,
संस्कृतीचा हा वारसा, मनात त्यांच्या भरू या.
होऊन सारे एकत्र, एकच हुंकार सारे देऊ या,
अभिमानाने जगण्याचा, मार्ग मोकळा करू या.

शब्दांकन :
दादासाहेब फाळके राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार सन्मानित
साहित्यिक : संतोष चिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *