
दिनांक: ११/०६/२०२६
सातारा/वाई: के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षीचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. संतोष चिले यांना त्यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि सृजनशील लेखणीसाठी प्रदान करण्यात आला आहे.
‘मिरग नक्षत्र’ हे साहित्य, संस्कृती आणि संवेदनांचा संगम असलेले व्यासपीठ असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. ७ जून २०२६ रोजी वाई (जि. सातारा) येथील रमेस गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या लेखकांचा गौरव होऊन नवी पिढी साहित्याकडे अधिक उत्साहाने आकर्षित होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
या पुरस्कारामुळे मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या लेखकांचा गौरव होऊन नवी पिढी साहित्याकडे अधिक उत्साहाने आकर्षित होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सलग चाललेल्या या सोहळ्यात कवी संतोष चिले यांनी
उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. साहित्यिकांचे दर्जेदार काव्य सादरीकरण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याने या ‘मिरग नक्षत्र’ संमेलनाची महती वाढवली. शेवटी ‘जय शिवराय, जय भारत’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.
