आताच शेअर करा

दिनांक: १९/०७/२०२६

सावंतवाडी: नारायण आसयेकर प्रस्तुत श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांच्यावतीने ‘वटसिद्ध नागनाथा तू उभारीले अनंता’ या नवीन ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. अद्भुत दृश्ये आणि आकर्षक ट्रिकसीनच्या माध्यमातून हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या नाट्यप्रयोगाची कथा व संकल्पना दशावतारी कलाकार नारायण आसयेकर यांची आहे. या नाट्य प्रयोगात स्वर्गातून चारमुखी ब्रह्मदेवाचे कमळात विराजमान होणे, मोरावर आरूढ देवी सरस्वतीचे प्रेक्षकांमधून रंगमंचावर आगमन, जीवंत माणसाला पेटत्या अग्नीत टाकून पुन्हा जिवंत बाहेर काढणे, रंगमंचावर प्रत्यक्ष नागीण फिरणे, अंड्यातून बालकाचा जन्म होणे, बालकाचे अधांतरी जाऊन वटवृक्षात प्रवेश करणे, अधांतरी पक्षी उडणे तसेच खाण्याचे पदार्थ आपोआप तयार होणे, दत्तगुरूंचे गाय व चार श्वानांसह भव्य दर्शन, रंगमंचावर साकारण्यात आलेली झोपडी, रंगमंचावर वटवृक्षाचे दर्शन, दत्तकृपेने अधांतरी वस्त्रे खाली येणे, गुरु दत्तात्रयांची आरती आणि दत्तभक्तांसाठी दर्शन सोहळा अशा विविध अद्भुत ट्रिकसीनचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘भय नाही कोणाचे, जोवर आशीर्वाद आहेत नाथांचे… इथे माणूस जळत नाही, अहंकार जळतो,’ हा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात आला आहे. दशावतार कलेच्या माध्यमातून पौराणिक कथेला आधुनिक रंगत आणि अद्भुत दृश्यांची जोड देणारा हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.या नाट्यप्रयोगाच्या आयोजनासाठी नारायण आसयेकर-९४२२९२१०३५ / ९७०२१७५८०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नारायण आसयेकर प्रस्तुत श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *