
दिनांक: १३/०५/२०२६
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
तळवणे गावातील कु. मयुरी दत्ताराम गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड झाली असून लहानपणापासूनच खेळाची आवड आणि सतत मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर आज कु. मयुरी गावडे हिने आपलं नाव तसेच आपल्या गावाचं नाव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल आहे.
तळवणे हा खेडेगाव असून येथे गावात जास्त काही तशा बसेसच्या फेऱ्या नसायच्या तर त्याला पर्याय म्हणून कोंडूरा ते तळवणे येथे काहीवेळा पायी प्रवास ये-जा करत आपल्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत जळत ठेवली. खेळला महत्व देऊन शरीर सुदृढ बनवले. या दोन्ही सांगड घालून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज ठाणे जिल्ह्याच्या पोलिस पदी बाजी मारत आज पोलिस होण्याचा मान मिळवला.स्वतःचा पोलीस बनण्याचा प्रवास पार पाडला.
तळवणे गावातील सर्व स्थानिकांकडून तसेच सर्व स्तरावर कु. मयूरी गावडे हीच कौतुक केलं जात आहे.
