
दिनांक: २३/०४/२०२६
कणकवली: : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुहास सहदेव माधव (वय ३७), सुशांत सहदेव माधव (वय ३५), रामचंद्र सुहास माधव (वय ९) आणि स्वरा सुहास माधव (वय ३२, ) सर्व रहिवाशी सावंतवाडी तालुक्यातील सरमळे नागरतास वाडीतील रहिवाशी असून हे चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव येथील जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थेची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक अमोल धोंडू तेली यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले.
सुहास हे आपल्या मुलाची परीक्षा संपल्या नंतर काल संध्याकाळी मुंबई वरून गावी येण्यास स्वतःच्या कार मधून निघाले होते.
