
दिनांक: ०६/०४/२०२६
बांदा: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ या शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत कु. शरण्या संदिप वायंगणकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेतील एकूण चार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते, त्यापैकी शरण्याने उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा लौकिक उंचावला आहे.
या यशामागे शरण्याची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत यासोबतच तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदांचे मोलाचे योगदान आहे. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच तिचे पालक यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.
शरण्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच शाळेची व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ आणि विद्यार्थी सुरक्षा समिती यांनीही तिचे अभिनंदन करून तिच्या यशाचे कौतुक केले आहे.
तिच्या पुढील शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यातही तिने असेच मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक श्री. शांताराम असणकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत, अर्चना देसाई तसेच परब सर, सावळ सर, फर्नांडिस सर, प्रसेनजीत सर, कांबळे मॅडम, धुरी मॅडम, धामापूरकर मॅडम, ठाकर मॅडम, मोरे मॅडम यांनीही शरण्याचे कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शरण्याच्या या यशामुळे शाळेचा अभिमान वाढला असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे
