आताच शेअर करा

दिनांक २३/११/२०२६

सातार्डा प्रतिनिधी:संदीप कवठणकर

सातार्डा:सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रा उत्सव उद्या दिनांक २४ नोव्हेंबर रोजी होत असूनसर्व भाविकांना कळविण्यात येथे की देवस्थानाचे खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.२४ तारीखला (त्रिपुरारी पौर्णिमा ) भव्य श्री देव रवळनाथाचा जत्रा उत्सव होणार असून कार्यक्रमात देवाची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे तसेच गाऱ्हाणे बोलणे होणार आहे. बुधवार दिनांक २५ रोजी श्री देव रवळनाथाचा कौलोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान पंचायतन समिती कडून व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed