आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक : ५ जुलै २०२४


   विविध जनकल्याणच्या योजना राबविणारे व गोरगरिबांच्या कल्याणासाठी नेहमीच झटणारे रामराजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे होते. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांचा उल्लेख रामराजे असा केला होता. त्यांच्या विचारांचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले.
   येथील नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्नीता सावंत, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते.
   यावेळी एस आर सावंत यांनी बापूसाहेब महाराजांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. बापूसाहेब हे आपल्या कार्यकाळात येथील नट वाचनालयच्या इमारतीत बसून वाचन करत असत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून ते त्यांच्या व्यथा जाणून घेत.
   आभार राकेश केसरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *