आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक: २३ जून २०२४

बांदा येथील महावितरण कंपनीचे उप अभियंता व कर्मचारी नॉट रिचेबल.निगुडे गावात गेले कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू असून जिकडे तिकडे विजेच्या तारा तुटून  विद्युत पुरवठा खंडित होत आहे.तसेच विजेच्या तारावर झाडंझुडूपं व वेलींनी  विळखा घातला आहे तसेच ब-याच ठिकाणी विद्युत खांब कोलमडले असून काही खांबांना गंज लागून तुटून पडण्याच्या स्थितीत आहेत ही बाब शाखा उप अभियंता यांना लेखी निवेदने दिलेली असून वस्तुस्थितिही दाखवून दिली आहे परंतु ते खांब बदलण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही.फक्त आश्वासन दिली जातात पण कृतीत आणले जात नाही. त्यामुळे निगुडे गावातील वायरमन ट्रिट लाईन दुरुस्ती करताना विजेचा शॉक लागून मरता मरता वाचला आहे. शासन भारनियमन करून विधुत बचत करत आहे असे असताना निगुडे गावातील ट्रिट लाईट गेले ५/६ दिवस  २४ तास सुरू आहे याकडे कोणताही कर्मचारी/अधिकारी लक्ष देत नाही किंवा लाईट मधिल झालेला बिघाड दुरुस्ती करत नाही. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. हा बिघाड व समस्यांची एक/दोन दिवसांत पुर्तता न केल्यास विद्युत महामंडळाच्या बांदा कार्यालयावर अचानक धडक मोर्चा काढण्याचा इशारा निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर आणि निगुडे ग्रामस्थानी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *