आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी:संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक : २४ जून २०२४

गोवा येथे गेले वर्षभर लोकांच्या सेवेत असलेले रॉयल स्ट्रीट कॅफे ग्राहकांच्या उदंड प्रतिसादा मुळे आज प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत.गेली वर्षभर रॉयल स्ट्रीट कॅफे साठी श्री. दशरथ घाडी व त्यांच्या परिवाराने प्रचंड मेहनत घेऊन उभा केला आहे. यामुळे अल्पावधीतच हा कॅफे लोकांच्या पसंतीस आला आहे. असे मत वझरी येथील सरपंच अनिल शेट्टी यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. तसेच कासारवर्णे सरपंच सौ. अवनी गाड म्हणाल्या की या कॅफे मध्ये चांगले व रुचकर पदार्थ चाखायला मिळतात. म्हणुन हा कॅफे लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच कॅफे स्ट्रीट  डेकोरेट आणि डिझायनिंग उत्तम प्रकारे केल्यामुळे ग्राहक येवून येथे स्थिरावला जातो. कॅफेतील बहुसंख्य प्रकारचे पदार्थ रुचकर व चविष्ट असल्याने त्याचा आस्वाद घेता येतो.त्यामूळे ग्राहक समाधानी आहे. आज कॅफेला एक वर्ष पुर्ण होत आहे या बद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या. बैठक कॅफे चे प्रमुख सौ. सोनम गवस म्हणाल्या की ग्राहकांच्या पसंतीमुळे कॅफे लवकरच नावारूपाला आला. या कॅफे च्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असे मत सौ.गवस यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर  प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिल शेट्टी (वझरी सरपंच ) सौ. अवनी गाड (सरपंच कासारवर्णे) सौ. मयुरी तुळसकर (सरपंच वारखंड) सचिन गवस, सोनम गवस आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल श्री. दशरत घाडी, अस्मिता घाडी पार्थ घाडी आणि अक्षय घाडी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *