बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: २२ जून २०२४
बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक २१ जून रोजी शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी सावंतवाडी तहसील प्रभारी श्री.मयुरेशजी गवंडळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगा शिकवला तसेच बांदा पतंजली योग समितीच्या सौ.राखीताई कळंगुटकर आदी उपस्थित होत्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी योग दिनाचे औचित्य साधून आपल्या आयुष्यात योगाचे असलेले महत्त्व सांगितले नंतर सर्वांनी योगा प्रात्यक्षिकेही केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी शाळेचे इतर शिक्षकही उपस्थित होते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची योगासने करून घेण्यात आली. शिक्षिका सौ. स्नेहा नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.