सावंतवाडी प्रतिनिधी : विशाल गावकर
दिनांक:२१ जून २०२४
सावंतवाडी माजगाव येथील कासारवाडा येथे गेली ७० वर्षे आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली जाते. कासारवाड्यातील महिलावर्ग घरामध्ये वटवृक्षाची फांदी पूजेला लावून पूजन न करता गोठणेश्वर मंदिराजवळ येऊन तिथे असलेल्या वटवृक्षाला फेऱ्या मारून ही वटपोर्णिमा साजरी केली जाते. ह्या वटवृक्षाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गोठ्णीचा आंबा ह्या ठिकाणावर आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाला छोटीशी पारंबी लोंबत होती. पण तिथेच नागदेवतेचे वास्तव्य असल्याकारणाने त्याच्या सभोवती ही नागदेवता संरक्षणासाठी आंब्याचा फांदीवर असायची त्यानंतर काही दिवसांनी ही वटवृक्षाची पारंबी जमिनीपर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी आज भला मोठा वटवृक्ष निर्माण झाला व आंब्याचे झाड नष्ट झाले आहे. हे ठिकाण आज माजगाव येथे कासारवड्यात गोठणेश्र्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हा वटवृक्ष गेली ७० वर्षापासून कायम स्थित असून येथे दरवर्षी वटपौर्णिमा ही ह्या वटवृक्षाच्या झाडाखाली साजरी केली जाते. आजही नगदेवता येथे वास्तव्यास असून नागपंचमी दिवशी रात्रीच्या वेळेस अदृश्य रुपात येऊन दूध प्राशन करते. हया वर्षी वटपौर्णिमा साजरी करत असताना सौ. भारती कासार, आश्विनी कासार, दिप्ती कासार, अनिशा कासार, प्रतिभा कासार, प्रियंका कासार, प्रेषा कासार, विलासिनी कासार, वैशाली कासार, सुवर्णा कासार, श्रुती कासार, प्रतीक्षा कासार, अर्पिता कासार, सुरेखा कासार, समीक्षा कासार, कविता कासार, प्रिती कासार आणि दीपा एकावडे उपस्थीत होते.