आताच शेअर करा

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५

ओटवणे प्रतिनिधी
गुंडू सावंत यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून अनेक शाळासह मुलांचा सर्वांगीण विकास साधला. त्यामुळे आदर्शवत आणि अभिमान वाटावा असे त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आहे. असे प्रतिपादन त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले.
        ओवळीये गावचे सुपुत्र तथा सांगेली आणि दाणोली केंद्रप्रमुख गुंडू अर्जुन सावंत हे आपल्या ३६ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदीर्घ आदर्श शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त सांगेली केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, सांगेली पंचक्रोशीतील सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे, गटशिक्षणाधिकारी सविता परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक सावंत, सागर सांगेलकर, म ल देसाई, नारायण नाईक, अभिजीत जाधव, संजय शेडगे, विजय गावडे, सांगेली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक  तसेच गुंडू सावंत यांच्या पत्नी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ युगंधरा सावंत, मुलगा सावंतवाडीतील श्री वेंकटेश्वरा मेडिकल स्टोअर्सचे मालक आशिष सावंत, सून सावंतवाडीच्या वेलकेअर फार्मसीच्या सौ कविता सावंत उपस्थित होत्या.
            यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुंडू सावंत यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गुंडू सावंत यांनी आपल्या शैक्षणिक कार्यात सहकार्य करणाऱ्या कुटुंबीयांसह सर्व सहकारी, लोकप्रतिनिधी व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थ यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर जाधव सुत्रसंचालन परेश नाईक व शंकर पावसकर तर आभार बाबली चिले यांनी मानले.

दाणोली केंद्रातर्फे ही गौरव
        दाणोली केंद्राच्यावतीने देवसु प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला देवसु देवस्थानचे मानकरी हनुमंत सावंत, विठ्ठल सावंत, देवसू हायस्कूलचे मुख्याध्यापक आर डी पाटील, देवसू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मेस्त्री, माजी अध्यक्ष श्री देऊसकर, दाणोली बाजार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर मालवणकर, उपाध्यक्ष उमेश सावंत, दाणोली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आणि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सावंत सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर तर आभार सुभाष सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *