आताच शेअर करा

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५

शिरोडा प्रतिनिधि: गांधीनगर, शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला वर्ष २०३० मधे १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी सत्याग्रहाचे स्मारक उभारण्यात यावे आणि यासाठीची सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी शिरोडा येथील जागरूक नागरिक व इतिहासप्रेमी यांनी २ ऑक्टोबर या गांधी जयंती घ्या दिवशी येथे लाक्षणिक उपोषण केले. वेंगुर्लेचे तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांनी उपोषणस्थळी ” याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून जमिनीच्या हस्तांतरणाचा विषय मार्गी लावू” असे आश्वासन दिले. तसेच स्थानिक आमदार श्री. दीपक केसरकर यांनी ही भ्रमणभाष वरून संपर्क करुन आंदोलना विषयी माहिती करून घेतली आणि “लवकरच नियोजित सत्याग्रह स्मारकाच्या ठिकाणी भेट देणार” असल्याचे सांगितले.

” एकच नारा – स्मारक उभारा”
जमिन द्या! जमिन द्या!!- स्मारकासाठी जमिन द्या!!!
अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ज्ञानेश्वर माऊली वारकरी भजन मंडळाकडून येथे भजन सादर करून स्मारक उभारणारणीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

शिरोडा गावचे सरपंच सौ. लतिका रेडकर, उपसरपंच श्री. चंदन हाडकी, माजी सरपंच श्री. मनोज उगवेकर, माजी उपसरपंच श्री. राहुल गावडे इतर प्रतिष्ठीत नागरिक कौशिक परब, कॉग्रेसच्या इर्शाद शेख यांनी उपोषणकर्तेशी संवाद साधला.

यावेळी उपोषणात . श्री. संदीप रामकृष्ण गावडे,  श्री. प्रथमेश गणेश परब, . श्री. सुनील श्री कृष्ण गावडे, . श्री. नारायण बाळकृष्ण गावडे,. श्री. दिंगबर सीताराम परब,  श्री. देवेंश विठोबा गावडे,  श्री. विशाल मनोहर गावडे,  श्री. गोपीनाथ मोतीराम राऊत,  श्री. महेश पांडुरंग परब,श्री. संदीप शंकर परब११. आत्माराम दत्ताराम राऊत, प्रवीण महादेव धानजी, आनंद बलराम मसुरकर,अमोल पांडुरंग परब,पुंडलिक आत्माराम परब,सौ.दिपाश्री दिलीप राऊत,  श्री. राकेश विश्वनाथ परब, श्री. शिवराम रघुनाथ मयेकर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *